Sunday, December 27, 2009

इतुके बोलिले मज श्रीराम.......

काळ्या निशेच्या उदरातून जन्मली एक सोनेरी पहाट

अन् मज कर्णान्शि हितगुज कराया कोठोनि आला एक स्वर

"अंतर्मुख होऊनि ओळख मजला मीच तो श्रीधर"

ते निद्रिस्त कर्ण जाहाले जागे ऐकोनि प्रभू चे नाम

इतुके बोलिले मज श्रीराम !!



मी अन् माझ करण्यात अखंड जातो तुजला दिस

अन् संकट काळी कशास रे मग बोलतोस मजला नवस

ह्याच मी पणास्तव फुट्ती तव मनी द्वेषाचे अंकुर

ह्या मिपणास समुळ मारी नामी भस्मासुर

नामाच्या नौकेत बैसोनी येई इश्वरी धाम

इतुके बोलिले मज श्रीराम!!



देवळात येओनि प्रार्थितोस चरणी ठेवोनि तव मस्तक

बाहेर पड्ताच शड्रीपुन्शी होतोस रे नतमस्तक

चालता बोलता उठ्ता तुजला विषयाची रे संगत

विषयान्ती विकार तुजला आहेत रे अवगत

नांम रथ ई आरूढ हो मज सोप्वोनी रिपुन्चे लगाम

इतुके बोलिले मज श्रीराम!!



लक्ष्मी सरस्वती येतील द्वारी, कर गीतेचे पारायण

गीतेत असे सामर्थ्य वसे, करी नरास नारायण

भक्ति अथवा न्यानमार्गे अंती प्राप्त तो मोक्ष

पामरास न्यानि म्हणाया अनेक जन्माची साक्ष

हे अध्यात्मिक गुहय सांगोनी प्रभू पाविले अन्तर्धान

इतुके बोलिले मज श्रीराम!!



                                                                               ---सौरभ

2 comments:

निखिल said...

पिट्टू, मुंबईचा असूनही तुझं मराठी शब्दभांडार खूप चांगलं आहे. कविता पण खूप छान जमलीय. पहिली SAD नसणारी कविता! Congrats!!! फक्त एक काम करा. Correct typing mistakes.मग खूप छान वाटेल.

sauru said...

Arey tula kay sangu...vaitaglo mi type karta karta....mala jasa shabd hava hota tasa yetach navta...khup vaitaglo....shevti jaoode mhatla...vachak samjun ghetil ;)